टिळकवाडी पोलिसांची कारवाई
चार दिवसांपूर्वी एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी गुरुवारी कुरबर गल्ली अनगोळ येथील एका तरुणाला अटक केली आहे.
चैतन उर्फ चेतन मारुती शिंदे (वय 22 रा. अनगोळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
30 डिसेंबर रोजी रात्री कुरबर गल्ली अनगोळ येथील सिद्धेश्वर विठ्ठल मुकन्नवर यांच्या बंद घराची कडीकोयंडा तोडून साडेपाच ग्रॅमची चैन व साडेतीन ग्रॅम कर्णफुले चोरण्यात आली होती. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात भादंवि 454, 457, 380 कलमान्वये एफआयाआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चेतनला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.