अनेक वाहनातून दारु जप्त, : वाळपई अबकारी अधिकाऱयांकडून कारवाई
प्रतिनिधी /वाळपई
बेळगाव भागात जात असल्याचे निमित्त करून सुरला घाट परिसरात कोसळणाऱया धबधब्यांच्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर रविवारी वाळपई अबकारी कार्यालयाच्या केरी येथील तपासणी नाक्मयावर कडक तपासणी करण्यात आली. नाक्मयावरील कर्मचारी प्रत्येक वाहनांची झडती घेताना दिसत होते. अनेक वाहनातून दारू जप्त केल्याची माहिती हाती आलेली आहे. या कारवाईचे केरी भागातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास सरकारी यंत्रणेने प्रतिबंध केलेला आहे. गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरात डोंगराळ भागात धबधबे कोसळत असतात. दोन वर्षापूर्वी या महामार्गावर पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करत होते. कोविडमुळे गेली दोन वर्षे धबधब्यांवर जाण्यास बंदी आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून काही प्रमाणात पर्यटक बेळगाव या ठिकाणी जात असल्याचे खोटी कारणे देऊन चोर्ला परिसरातील धबधब्यांवर गर्दी करून धिंगाणा घालीत असल्याच्या तक्रारीत वाढ झालेली आहे.
याची दखल घेऊन वाळपई अबकारी कार्यालयाच्या अधिकाऱयांनी केरी तपासणी केंद्रावरील यंत्रणा कडक केलेली आहे. रविवारी सकाळपासून प्रत्येक वाहनाची झाडाझडती घेण्यात आली. याबाबत वाळपई अबकारी निरीक्षक हनुमंतराव देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की चोर्ला घाट परिसरामध्ये मागच्या आठवडय़ामध्ये पर्यटकांनी धबधब्यांवर धिंगाणा घातल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे याची गंभीर दखल घेऊन आज कडक तपासणी हाती घेण्यात आली होती. या तपासणी दरम्यान अनेक वाहनातून बेकायदेशीरपणे दारू नेत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनेक वाहनातून दारू जप्त करण्यात आलेली आहे. सदर वाहने गोव्यातील नोंदणीकृत आहेत.
सध्यातरी कोविड महामारीमुळे केरी तपासणी नाक्यावर मर्यादित कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर सदर ठिकाणी खास पथक तैनात करण्यात येणार असल्याचे अबकारी निरीक्षक हनुमंतराव देसाई यांनी स्पष्ट केले आहे.