जागतिक आरोग्य संघटनेने अखेरीस विदेशी तज्ञांचे पथक चीनला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक तेथे कोरोना विषाणूच्या फैलावाची चौकशी करणार आहे. जागतिक आरोग्यतज्ञ आणि साथरोगतज्ञांचे एक पथक चीनमध्ये पाठविले जाणार आहे. कोरोना चीनमध्ये कसा फैलावला आणि याचा मुख्य स्रोत कोण होता याचा शोध हे पथक घेणार आहे. हा संसर्ग प्राण्यामधून माणसांमध्ये पोहोचला का याचे दुसरे कारण आहे हेही पाहिले जाणार आहे. चीन पथकाला सर्व सुविधा उपलब्ध करेल अशी अपेक्षा असल्याचे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकल रेयान यांनी म्हटले आहे.
Previous Articleकोरोनाचा टी-पेशींवर पडतो प्रभाव
Next Article अमेरिका : दिलासा नाही
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.