प्रतिनिधी /कुंकळ्ळी
तारीवाडा, बेतूल येथील श्री चौचार श्री शांतादुर्गा महादेव देवस्थानात वार्षिक शिवरात्री उत्सवानिमित्त आज 1 रोजी अभिषेक, आरत्या, प्रसाद, रात्री 8 वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर भजन, आरत्या व प्रसाद, 2 रोजी रात्री 10 वा. सांस्कृतिक कार्यक्रम व 3 रोजी रात्री 10.30 वाजता कोकणी विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल. त्यानंतर आरत्या, प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना अभिषेक करण्याची मोकळीक ठेवण्यात आली आहे. देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर जोशी व सचिव राजेश मेथा, खजिनदार महेश जुवटकर उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.