ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3.50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 51 लाख 52 हजार 675 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 10 लाख 38 हजार 151 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 2 लाख 95 हजार 272 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3.51 लाख बाधितांपैकी 2 कोटी 61 लाख 34 हजार 446 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 79 लाख 80 हजार 078 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 66 हजार 055 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 76 लाख 846 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 48 लाख 18 हजार 509 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 14 हजार 277 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 65 लाख 49 हजार 373 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 55 लाख 09 हजार 966 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 01 हजार 812 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.