ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 5 कोटी 95 लाख 16 हजार 610 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 14 लाख 02 हजार 042 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी जगभरात 5 लाख 04 हजार 521 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 7953 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5.95 कोटी बाधितांपैकी 4 कोटी 11 लाख 57 हजार 776 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 69 लाख 56 हजार 792 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 03 हजार 599 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 1 कोटी 27 लाख 77 हजार 371 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 75 लाख 49 हजार 014 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 63 हजार 687 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 91 लाख 77 हजार 840 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 86 लाख 04 हजार 955 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 34 हजार 254 जणांचा मृत्यू झाला आहे.