ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाबधितांच्या संख्येने 8 कोटींचा आकडा ओलांडला आहे. जगात आतापर्यंत 8 कोटी 02 लाख 07 हजार 155 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 17 लाख 57 हजार 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी जगभरात 4 लाख 72 हजार 443 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 8 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 8.02 कोटी बाधितांपैकी 5 कोटी 64 लाख 71 हजार 521 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 2 कोटी 19 लाख 77 हजार 994 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 05 हजार 785 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. तिथे 1 कोटी 92 लाख 10 हजार 166 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 12 लाख 57 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 38 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात 1 कोटी 01 लाख 69 हजार 818 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 97 लाख 39 हजार 382 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 47 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.