मोठमोठय़ा चाकूंनी केला जातो मसाज
आतापर्यंत तुम्ही तेल, क्रीम, प्रूट्सच्या मदतीने होणाऱया मसाजबद्दल ऐकले असेल. तैवानमध्ये या सर्वांसोबत एक असा मसाज केला जातो, ज्याला जगातील सर्वात धोकादायक पद्धत मानली जाते. या मसाजसाठी तैवानमध्ये 2000 वर्षांपेक्षा जुन्या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
येथे मसाज थेरेपिस्ट मीट चॉप करणाऱया दोन मोठय़ा चाकूंचा वापर करतात. राजधानी तैपैइंमध्ये या पद्धतीने मसाज करणारे अनेक पार्लर आहेत. यात थेरेपिस्ट दोन चाकूंना रसायनाने स्वच्छ केल्यावर पूर्ण शरीरावर सौम्य वार करतात. पण चाकूचा वार करण्यापूर्वी शरीराला कपडय़ाने झाकण्यात येते.
यात स्टीलचे दोन चाकू थंड करून ठेवले जातात. त्यांना हलक्या हाताने किंवा अधिक दबाव देत शरीरावरून फिरविले जाते. प्रथम पाठ आणि हातावर चाकूंनी हलला प्रहार केला जातो, त्यानंतर अखेरीस शीर आणि चेहऱयावर ही कृती केली जाते. बहुतांश लोकांना चाकूंनी होणाऱया मसाजचा थांगपत्ता त्या परस्परांना आदळल्या तरच लागत असतो.
या मसाजकरता शरीर सैल सोडून डोळे बंद करून घ्यावे लागतात. या मसाजमुळे शरीराची खरी शक्ती आणि जीवनशक्ती दुरुस्त होते असे या थेरेपिस्टचे म्हणणे आहे. या धोकादायक मसाजच्या माध्यमातून फिजिकल आणि इमोशनल हीलिंग केली जाऊ शकते. चीनमध्ये मसाजची पद्धत 2000 वर्षांपासून वैद्यकीय उपचारांचा महत्त्वाचा हिस्सा आहे. या मसाज पद्धतीचा प्रसार चीनच्या बौद्ध भिक्षूंनी केला होता. तर सुमारे 1 हजार वर्षांपूर्वी तांग वंशाने ही पद्धत जपानमध्ये फैलावली होती. चीनमध्ये झालेल्या 1940 च्या गृहयुद्धानंतर तैवानमध्येही मसाजाची ही पद्धत प्रचलित आहे.
जपान आणि चीनमध्ये सध्या चाकूंनी मसाज करणारे पार्लर शोधणे कठिण आहे. तर तैवानमध्ये अलिकडच्या काळात या मसाजचा वापर वाढला आहे. धावपळीच्या जीवनामुळे निर्माण होणाऱया तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी लोक चाकूंनी मसाज करवून घेतात. सध्या लोक नाइफ मसाजचा वापर आजार दूर करणे, चांगली झोप आणि तणाव दूर करण्यासाठी करत आहेत.