नवी दिल्ली
टाटा मोटर्स यांच्या मालकिच्या जग्वार लँड रोव्हरने एप्रिल ते जूनच्या तिमाहीत मोटार विक्रीत 68 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. कंपनीने सदरच्या कालावधीत 1 लाख 24 हजार 537 वाहनांची विक्री केली आहे. पण सध्याला जागतिक स्तरावर चिपच्या टंचाईचा सामना कंपनीला झेलावा लागत असून याचा परिणाम सप्टेंबरच्या तिमाहीत दिसेल, असे कंपनीने म्हटले आहे. जेएलआरच्या किरकोळ वाहन विक्रीत वर्षाच्या आधारे पाहता 68 टक्के वाढ दिसली आहे. यात इंग्लंड, युरोप, उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये कंपनीची वाहन विक्री अधिक राहिली आहे.