वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी उपविभागातील 18 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. जनता कर्फ्यू, लॉकडाऊन असे उपाय सरकारने करूनही बऱयाच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असून बाजारात नागरिक गर्दी करत आहेत.
जमखंडी विभागातील जमखंडीत 10, मुधोळ 3, सावळगी 2, लोकापूर 2, तेरदाळ 1 असे पोलीस कोरोनाबाधित झाले असून त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विनाकारण रस्त्यातून दुचाकीवरून घिरटय़ा मारणे, फिरणे आदी न करता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन डीवायएसपी पांडुरंगय्या यांनी केले आहे. दि. 10 मेपासून विनाकारण फिरणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.