वार्ताहर/ जमखंडी
नगरपालिकेच्या कर्मचाऱयांना मासिक वेतन वेळेवर मिळत नसून रोजंदारी कर्मचाऱयांना पीएफ, ईएसआय सुविधा देण्यात येत नसल्याचा निषेध म्हणून जमखंडी नगरपालिकेसमोर निदर्शने सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदाराबरोबर अधिकारी सामील होऊन कर्मचाऱयांवर अन्याय करीत आहेत. दिवसात बारा तास काम करून पण योग्य वेतन व वेळेत वेतन मिळत नसल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करत प्रधानमंत्री हमी योजने इतकी पण मजुरी मिळत नसून अधिकारी वेतनातून कमिशन घेत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी अजय तेरदाळ, शिवरुद्रप्पा कडकोळ, संजू जाधव, अनिल तेरदाळ, शिवाप्पा हादीमनी, निरुपाद दोडमनी, संभाजी हवारी, रवि हुद्दार, मयाप्पा हवारी आदींनी भाग घेतला.