संयुक्त सुरक्षा दलाची शोपियामध्ये कामगिरी, शोध मोहिम सुरुच
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्हय़ात बुधवारी सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी मारले गेले. मंगळवारी रात्री उशीरा काही दहशतवाद्यांनी मेलहुरा गावात आसरा घेतल्याची माहिती घेतल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने संपूर्ण गावाला घेरले आणि शोध अभियान सुरु केले.
या दरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरु करुन शोध पथकातील जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आधी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याबाबत आवाहन केले. मात्र तरीही गोळीबार न थांबल्याने संयुक्त पथकाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये चारही दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. तसेच शोध अभियानही सुरु असल्याचे सांगितले.