ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू – काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मात्र, या झालेल्या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून एलओसीच्या भागात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात चार जवान जखमी झाले. मात्र, दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा डाव हाणून पाडला. तर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन जवानांचा खात्मा देखील करण्यात आला.
दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या बाजूने पडले असून अजूनही पाकिस्तानी सैन्याने उचलले नाही आहेत. 2021 मध्ये पाकिस्तानकडून केले गेलेले हे पहिले मोठे शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे.
दरम्यान, मिळालेल्या अधिक माहिती नुसार, प्रजासत्ताक दिनी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्राने अल – बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि याव्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यापासून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे