ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. सलग तिसऱ्या दिवशी हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात 1013 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 44 हजार 570 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 600 आणि काश्मीर मधील 413 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 11 हजार 009 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 5073 आणि काश्मीरमधील 5936 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 32,760 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 7240 रुग्ण जम्मूतील तर 25,520 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 801 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 105 जण तर काश्मीरमधील 696 जणांनी आपला जीव गमावला आहे.