ऑनलाईन टीम / जम्मू :
भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून मेंढर आणि नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तान कडून सतत गोळीबार सुरू आहे. यामध्ये सीमेलगत राहणाऱ्या लोकांचे बरेच नुकसान झाले आहे.
परंतु, पाकिस्तानचा घुसखोरी करण्याचा हा डाव भारतीय सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे. यामध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच या भागात अजूनही जवानांची शोध मोहीम सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भारतीय सुरक्षा दलाचे जवान हाणून पाडत आहेत.