ऑनलाईन टीम / जम्मू :
दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील कनिगम भागात गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. तर एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात असणाऱ्या कनिगम क्षेत्रात काही दहशतवादी असल्याची माहिती त्यांना मिळाली. ज्यानंतर तातडीने या भागाला छावणीचे स्वरुप आले. दहशतवाद्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यामध्ये तौसिफ अहमद नावाच्या दहशतवाद्याने शरणागती पत्करली, तर उरलेल्या तिघांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.