ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूमधील कालुचक येथील लष्करी स्थानकाजवळ आज पहाटे दोन ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले. त्यानंतर सुरक्षा दलाने तात्काळ या ड्रोनला लक्ष्य करत गोळीबार केला. मात्र, निशाणा चुकला. सुरक्षा दलाने या भागासह जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरही शोधमोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, रविवारीही दहशतवाद्यांनी जम्मू हवाई दलाच्या तांत्रिक विभागावर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. तर हवाई दल स्थानकाच्या इमारतीच्या छताचे काहीसे नुकसान झाले होते.