प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याभरापासून कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. गरजू आणि गरिबांना विविध संस्थांनी रेशन धान्य देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. सोमवारी जयभारत फौंडेशनच्यावतीने रेशनचे 100 किट कॅन्टोन्मेंट बोर्डकडे सुपूर्द केले.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच रेशन व भाजीपाला पुरविण्याचे कार्य सुरू आहे. त्याकरिता विविध संघटना, समाजसेवक, डॉक्टर, उद्योजकांनी मदत देऊ केली आहे. सोमवारी जयभारत फौंडेशनच्यावतीने रेशनचे 100 किट कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी जयभारत फौंडेशनचे जयंत हुंबरवाडी, कॅन्टोन्मेंट सदस्य साजिद शेख, किरण निपाणीकर, कॅन्टोन्मेंटचे अभियंते सतीश मण्णूरकर, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर, स्वच्छता निरीक्षक नागेश साके आदी उपस्थित होते.