जयसिंगपूर प्रतिनिधी
शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तेराव्या गल्लीतील माजी नगराध्यक्षा कोरोनाबाधित झाले आहेत तसेच नगराध्यक्षांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहे तर हेरवाडे कॉलनीमधील एक असे गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्याचे जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांनी सांगितले. सध्या जयसिंगपूरमध्ये 112 करोनाबाधित रुग्ण झालेले आहेत. त्यातील सहा मयत असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17 इतकी आहे