पिशव्या संपल्या पण दात्यांची लाईन नाही संपली.
प्रतिनिधी / मेढा
जवळवाडी ता.जावली येथिल ग्रामपंचायत व भैरवनाथ तरूण मंडळाचे वतीने रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते या शिबीरात महिलांसह 90 जणांनी रक्तदान केले. तर रिकाम्या पिशव्या संपल्या पण दात्यांची लाईन काही संपली नाही. अशी घटना मात्र पहिल्यांदाच घडली. अनेक ठिकाणी रक्त दातेच मिळत नसतात मात्र जवळवाडी र् गांवात मात्र चित्र वेगळेच होते.रक्तदान न करता आल्यामुळे अनेकांची निराशा झाली. यावेळी शिबीराला भेट देवून तहसिलदार शरद पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळवाडी येथे 1 एप्रिल 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत गावातील महिलांसह 90 जणांनी रक्तदान केले. तर रिकाम्या पिशव्या संपल्याने अनेकांची निराशा झाली.
या शिबीराला जावली तहसिलदार शरद पाटील,गट विकास अधिकारी सतिष बुध्दे,तालुका आरोग्य अधिकारी भगवानराव मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व युवकांनी खुप परिश्रम घेतले.