सरकारच्या इन्सेंटिव्हच्या मदतीने शक्मय : 2025 पर्यंत 70 टक्के हिस्सेदारी घेण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये मोबाईल चार्जर तयार करणाऱया कंपन्या आगामी काळात सरकारच्या इन्सेटिव्ह योजनेच्या मदतीने जागतिक स्तरावर चार्जरच्या बाजारातील जवळपास 50 टक्के वाटा आपल्या ताब्यात घेण्याचा अंदाज आहे, अशी माहिती इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) यांच्या अहवालातून सादर करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर मदरबोर्ड, प्रिंटिंग सर्किट बोर्ड असेंबली मॅन्युफॅक्चरिंग आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठीची शक्मयता मोठी असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
सरकारने उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी एक पत्र सादर केले आहे. याच्या आधारे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनास चालना देण्यासाठी व येत्या 2025 पर्यंत 20 लाख रोजगार उपलब्ध करण्यासाठी जवळपास 48 हजार कोटी रुपयांची इन्सेटिव्ह योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना भरारी घेण्यासाठी येत्या 2025 पर्यंत या क्षेत्रात तब्बल 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आणि 10 लाख कोटीपर्यंत महसूल प्राप्त होण्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे.
मागील तीन वर्षातील निर्यात
मागील 3 वर्षात निर्यात 40 टक्के राहिली आहे. आयएएमएआयच्या अहवालानुसार येत्या 2025 पर्यंत जागतिक चार्जर बाजाराची उलाढाल ही 76 हजार कोटी रुपयांची होण्याचे संकेत आहेत. यात जवळपास 70 टक्के सहभाग हा स्मार्ट चार्जरचा राहणार आहे. तसेच मागील वर्षात 36.67 कोटी डॉलरच्या घरात चार्जर उद्योगाची निर्यात पोहोचली. 2016-17 मध्ये हा आकडा 14.30 कोटी डॉलरवर राहिला होता.