सेन्सेक्सची 661 अंकांची पडझड : वित्तीय कंपन्या नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी जागतिक पातळीवरील बाजारातील विक्री आणि देशातील वित्तीय कंपन्यांच्या समभाग नुकसानीच्या प्रभावामुळे बीएसई सेन्सेक्सने मंगळवारी 661 अंकांची पडझड नोंदवली आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स दिवसअखेर 660.63 अंकांनी घसरुन निर्देशांक 36,033.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 195.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,607.35 वर बंद झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक दोन्हींच्या समभाग घसरणीचा प्रभाव सेन्सेक्सवर पडला आहे. एचडीएफसी बँकेच्या वाहन कर्जाचा नियमावलीसह अन्य बाबीची चौकशी सुरु करण्यात आल्यानेच समभाग 1.98 टक्क्मयांनी घसरुन बंद झाले आहेत. यासोबत इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प आणि स्टेट बँक यांच्या समभागांचीही घसरण झाली आहे. दुसऱया बाजूला टायटन, भारती एअरटेल आणि बजाज ऑटोचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
प्रमुख क्षेत्रामध्ये वित्तीय आणि धातू कंपन्यांचे समभाग जवळपास 2 टक्क्मयांनी घसरले आहेत. यामध्ये प्रमुख वाहन क्षेत्रातील समभागांनी नफा वसुली केली आहे. या कारणामुळे पहिल्या तिमाहीत विक्रीचे आकडे समोर आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
गुंतवणूकदार प्रभावित
अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता तणाव आणि कोविड19 च्या संसर्गामुळे गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले आहेत. परंतु अन्य जागतिक पातळीवरील विचार केल्यास कोविडच्या वाढत्या संसर्गाने गुंतवणूकदार काळजीत पडले असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.