प्रतिनिधी/ चिकोडी
जागनूर (ता. चिकोडी) येथील 26 वषीय महिलेचा अनैतिक संबंधातून 31 डिसेंबर रोजी रात्री गळा दाबून खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याची घटना घडली आहे. रेणुका सिद्धाप्पा उप्पार (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे.
मृत रेणुकाचा घराशेजारी असलेल्या उसाच्या शेतात मृतदेह शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. याबाबत मृत महिलेचे वडील सिद्धाप्पा उप्पार यांनी चिकोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकरणाची चिकोडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक आर. आर पाटील व उपनिरीक्षक राकेश बगली अधिक तपास करीत आहेत. सदर महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाला असून तिचा खून केल्यानंतर सदर आरोपीनेही कीटकनाशक प्राशन केल्याने त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.