माजी आमदार फिरोज शेठ : पदाधिकाऱयांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण कुठल्याही एका विशिष्ठ जाती-धर्मासाठी सिमीत नसून, सर्वांना सहजरित्या उपलब्ध झाले पाहिजे, असे उद्गार फिरोज शेठ यांनी काढले. कर्नाटक राज्य सरकारी मुस्लीम कल्याणकारी संघ, बेळगाव शाखेच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नियाज हॉटेलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, ही सर्व समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षण सर्व जाती-धर्माच्या लोकांना मिळाले पाहिजे. या उद्देशाने आम्ही अंजुमन नावाची शिक्ष्ण संस्था सुरु केली आहे. एलकेजीपासून पीजीपर्यंत अभ्यासक्रम कुठल्याही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. सर्वजण आपापली जात-धर्म विसरुन एकत्र काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात कर्नाटक राज्य सरकारी मुस्लीम कल्याणकारी संघाच्या 2022 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केपीएससी चे पोलिस अधिक्षक हम्जा हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले व संघाच्या नवीन निवडून आलेल्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य हणमंत निराणी, बेळगाव काँग्रेस कमिटीचे राजू अनीस, बेळगाव डीडीपीआयबीएस नलतवाड व बेळगाव जिल्हय़ाचे सर्व मुस्लीम सरकारी कर्मचारी उपस्थित होते.