प्रतिनिधी / बेळगाव
कोविड-19 लसीकरणांतर्गत जायंट्स मेनच्यावतीने जिल्हा रुग्णालयात गुरुवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सर्व सदस्यांना लस घेतल्यानंतर अर्धातास विश्रांतीनंतर घरी जाऊ देण्यात आले.
लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून सौम्य स्वरुपातील त्रास उपचारांनी बरा होणार आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असून अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जायंट्सचे विभागीय संचालक मदन बामणे यांनी केले.
बिम्सचे संचालक विनय दास्तीकोप, अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, सचिव विजय बनसूर यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली.
शहरात कोरोना लसीकरण मोहीम शंभर टक्के करावयाची असल्यास त्यादृष्टीने सर्वसामान्य जनतेने लसीकरण प्रक्रियेला प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे मत जायंट्स मेनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मांडले. यावेळी जायंट्सचे सर्व सदस्य उपस्थित होते.