जिओला मिळाला 13 वा गुंतवणूकदार
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये होणाऱया गुंतवणूकीचा ओघ कायम असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आता क्वालकॉम वेंचर्स 730 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदर गुंतवणुकीच्या मदतीने क्वालकॉम वेंचर्स जिओमधील 0.15 टक्क्मयांची हिस्सेदारी घेणार आहे.
क्वालकॉम वेंचर्सच्या गुंतवणूक करारानंतर जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे एन्टरप्राईजे मूल्य 5.16 लाख कोटी रुपयावर गेले आहे. यामुळे सध्या जिओने 25.24 टक्के हिस्सेदारी विकून 1,18,318.45 कोटी रुपये जोडले आहेत. ही रक्कम 13 गुंतवणूकदारांच्या मदतीने केली आहे. यामध्ये सर्वाधिक फेसबुकची गुंतवणूक राहिली आहे.