नवी दिल्ली
जर आपल्याला पेट्रोल पंप डिलर व्हायचे असल्यास सध्या मुकेश अंबानी यांच्याकडून एक संधी निर्माण होत आहे. जिओ-बीपी यांच्याकडून रिटेल आउटलेट डिलर होण्यासाठीची संधी उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बीपीच्या अंतर्गत जॉईंट वेंचर रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड जिओ-बीपी ब्रँडच्या नावाने कार्यरत असल्याची माहिती आहे.
जिओ-बीपी यांनी आपले पहिले मोबिलिटी स्टेशन ऑक्टोबर 2021 मध्ये सुरु केले होते. जिओ-बीपी रिटेल आउटलेटवर ग्राहकांना ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीसोबत फ्यूल, सीएनजी, ईव्ही चार्जिंग, बॅटरी स्वॅप सोल्यूशन्स, स्टोर्स आणि कॅफे, एक्सप्रेस आईल चेंजची सुविधा मिळणार आहे.
कसा कराल अर्ज
जिओ-बीपी रिटेल आउटलेट डिलर बनण्यासाठी प्ttज्sः//ज्artहे.रग्दंज्.ग्ह (या लिंकवर भेट देत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट यावर नोंदणी करता येईल. यामध्ये नाव, राज्य, लोकेशन, ईमेल, मोबाईल नंबर यासह अन्य माहिती भरावी लागणार आहे.