प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या व सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अश्विनी गजाननराव बिडीकर व उपाध्यक्षपदी जयश्री विरसिंग भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. 2020 ते 2025 या कालावधीसाठी जुन्या संचालक मंडळाची फेरनिवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर नूतन अध्यक्षा व उपाध्यक्षांचे बँकेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे व संचालक मंडळांकडून अभिनंदन करण्यात आले.