प्रतिनिधी/ सातारा
पालिकेमध्ये बांधकाम विभाग म्हणजे महत्वाचा विभाग समजला जातो. या विभागातून शहरातील रस्ते, गटर, शौचालये आदींची कामे होत असतात. मात्र, बांधकाम सभपतींनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱयांकडे दिला आहे. नियमानुसार तो राजीनामा नगराध्यक्षांच्याकडे द्यायवाचा असतो. त्यामुळे अधिकृत असा राजीनामा मंजूर झाला नसल्याने पालिकेत बांधकाम सभापतींच्या केबीनबहेर नावाची पाटी नसली तरी सभापती नसल्याने अनेक कामे अडकून पडली आहेत. त्यामुळे सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांसोबत विरोधक असलेली नविआतील नगरसेवकही लवकर यावर निर्णय घ्या, अशीच आर्जव करु लागली आहे.
सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांनी सभापती निवडी करताना भाजपाच्या नगरसेविकेला बांधकाम सभापतीपद दिले. परंतु काही दिवसांमध्येच त्या सभापतींनी थेट नगराध्यक्षांवर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱयांकडे दिला. नियमानुसार सातारच्या मुख्याधिकाऱयांकडे राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यामुळे बांधकाम सभापतींचा राजीनामा हा जिल्हाधिकाऱयांकडे अडकल्याने पालिकेत बांधकाम सभापतीपदाबाबत अजून संभ्रम आहे. नव्यानेही निवडी करता येत नाहीत. कार्यक्रम निवडीचा लावता येईना झालेला आहे. बांधकाम सभापती नसल्याने बांधकाम विभागाच्या बैठका होत नाहीत.