सावंतवाडी/प्रतिनिधी –
जिल्हा काॅग्रेस सेवादल सरचिटणिसपदी गणपत पांडुरंग उर्फ बाळा नमशी यांची निवड झाली. निवड जिल्हाध्यक्ष श्रीकु्ष्ण तळवडेकर यांनी केली. नियुक्तीचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस ची कुडाळ येथे डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठकीच्यावेळी . अ.भा.काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री.बी.एम.संदीप, यांच्याहस्ते नमशी यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग प्रभारी श्री.विनायक देशमुख,प्रदेश सरचिटणीस श्री.आबा दळवी, जिल्हाध्यक्ष श्री.बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकास सावंत, कार्याध्यक्ष श्री.विलास गावडे, कुडाळ नगराध्यक्षा सौ.आफ्रिन करोल, महिला बाल कल्याण सभापती सौ.अक्षता खटावकर, महिला अध्यक्ष सौ.साक्षी वंजारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री.महेश अंधारी, युवक काँग्रेस, महिला, एन.एस.यु.आय., सेवादल, सोशल मीडिया या सर्व विभागांचे जिल्हाध्यक्ष ,सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारीणी सदस्य पदाधिकारी आदी उपस्थित होते.