मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे उडुपी जिल्ह्याची जबाबदारी : मुख्यमंत्र्यांनी केली नियुक्ती
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी जिल्हा पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद सतीश जारकीहोळी यांच्याकडे देण्यात आले आहे. तर उडुपी जिल्हा पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बेंगळूर शहर जिल्हा पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना देण्यात आले आहे. याचबरोबर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे तुमकूर, रामलिंगारे•ाr यांच्याकडे रामनगर आणि के. जे. जॉर्ज यांच्याकडे चिक्कमंगळूरची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचे निकटवर्तीय मंत्री महादेवप्पा यांच्याकडे म्हैसूरची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, अपेक्षेप्रमाणे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद मिळाले नसून, सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय सतीश जारकीहोळी यांची बेळगावच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडामंत्री नागेंद्र त्यांचा स्वत:चा जिल्हा असलेल्या बळ्ळारीचे पालकमंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
तुमकूर जिल्हा पालकमंत्रिपद मंत्री के. एन. राजण्णा यांना गमवावे लागले असून गृहमंत्री परमेश्वर यांच्याकडे तुमकूरचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यासह परमेश्वर पालकमंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांचा स्वत:चा जिल्हा त्यांचे निकटवर्तीय परिवहन मंत्री रामलिंगारे•ाr यांच्याकडे सोपविला आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी
जिल्हा पालकमंत्री
बेळगाव सतीश जारकीहोळी
धारवाड संतोष लाड
विजापूर एम. बी. पाटील
कारवार मंकाळू वैद्य
बागलकोट आर. बी. तिम्मापूर
बेंगळूर शहर डी. के. शिवकुमार
तुमकूर डॉ. जी. परमेश्वर
उडुपी लक्ष्मी हेब्बाळकर
बेंगळूर ग्रामीण के. एच. मुनियप्पा
रामनगर रामलिंगारे•ाr
चिक्कमंगळूर के. जे. जॉर्ज
मंगळूर दिनेश गुंडुराव
म्हैसूर एच. सी. महादेवप्पा
कलबुर्गी प्रियांक खर्गे
हावेरी शिवानंद पाटील
विजयनगर जमीर अहमद खान
यादगिरी शरणबसप्पा दर्शनापूर
बिदर ईश्वर खंड्रे
मंड्या एन. चलुवरायस्वामी
दावणगेरे एस. एस. मल्लिकार्जुन
रायचूर शरण प्रकाश पाटील
चामराजनगर के. वेंकटेश
कोप्पळ शिवराज तंगडगी
चित्रदुर्ग डी. सुधाकर
बळ्ळारी बी. नागेंद्र
हासन के. एन. राजण्णा
कोलार बी. एस. सुरेश
गदग एच. के. पाटील
शिमोगा मधू बंगारप्पा
चिक्कबळ्ळापूर एम. सी. सुधाकर
कोडगू एन. एस. भोसराजू