प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत 11 केंद्रांवर हे मतदान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी याबाबत माहिती दिली.
सातारा तालुक्याचे मतदान शासकीय तांत्रिक विद्यालय सातारा, छ. शाहू जिल्हा क्रिडा संकूल समोर, एस.टी स्टँडशेजारी पार पडणार आहे. जावळी तालुक्याचे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, मेढा ता. जावळी येथे, महाबळेश्वर तालुक्याचे शेठ गंगाधर माखरिया हायस्कुल, महाबळेश्वर येथे, कराड तालुक्याचे शिवाजी हायस्कुल कराड येथे, पाटण तालुक्याचे ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल पाटण, शासकीय विश्रामगृह रोड रामापूर, पाटण, कोरोगाव तालुक्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 तहसील कार्यालयामागे, पेट्रोलपंपाजवळ, कोरेगाव-पुसेगांव रोड कोरेगाव येथे होईल.
तर खटाव तालुक्याचे हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वडुज येथे, माण तालुक्याचे म. गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, दहिवडी येथे, खंडाळा तालुक्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे, वाई तालुक्याचे जनता शिक्षण संस्था, वाईचे किसन वीर महाविद्यालय, वाई पाचगणी रोड वाई व फलटण तालुक्याचे मुधोजी विद्यालय, फलटण नगरपालिकेशेजारी येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.