प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ाचे राजकारण ठरविणाऱया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. मात्र, तीन जागांसाठी ही निवडणूक अटळ झाली. खानापूर तालुक्मयामध्ये आमदार अंजली निंबाळकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात मोठी चुरस असून शुक्रवार दि. 6 रोजी ही निवडणूक होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 जागांपैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तीन जागादेखील बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी प्रयत्न करत होते. त्यांच्यासह इतर भाजपचे नेते मंडळीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना तीन ठिकाणी मात्र उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत आहे.
खानापूर तालुक्मयातील कृषी पत्तीन सोसायटीच्या जागेसाठी अटीतटीची निवडणूक होत आहे. आमदार अंजली निंबाळकर आणि अरविंद पाटील यांच्यात ही निवडणूक होत आहे. रामदुर्ग तालुक्मयातील कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीसाठी भीमाप्पा शिवाप्पा बेळवंकी आणि श्रीकांत शिवशंकऱयाप्पा ढवण यांच्यात ही निवडणूक होत आहे. विणकर सहकार संघातूनही दोन जण रिंगणात उतरले आहेत. कृष्णा रामलिंग अनगोळकर आणि गजानन निंगाप्पा कोळी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असल्याने या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर शुक्रवारीच बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता साऱयांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.