उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर : चेअरमन म्हणून कत्ती यांची पाचव्यांदा निवड
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची एकमताने निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह जिल्हय़ातील भाजप नेत्यांनी ही निवड केली आहे. रमेश कत्ती हे पाचव्यांदा चेअरमन म्हणून निवडून आले आहेत. निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची येत्या पाच वर्षात प्रगती करीन असे सांगितले. सध्या असलेल्या उलाढालीपेक्षा दुप्पट उलाढाल आणि नफा या बँकेला मिळवून देऊ असेही त्यांनी सांगितले.