सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठीचे नवीन आदेश लागू करण्यात आले असून सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत . स्पा, उपहारगृहे, वॉटरपार्क, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा असणार नाही. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढले आहेत.