अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 30 मार्च 2022, दुपारी 12.00
● स्वॅब तपासणी 488
● पॉझिटिव्हिटी 0.20 टक्के
● निर्बंध शिथिलतेकडे लक्ष
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात बाधित वाढ रोखली गेली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. तरीही बाधित वाढ ही एक ते दोन च्या दरम्यान नव्याने आढळून येत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात एकच रूग्ण आढळला असून काल दिवसभरात 488 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. 0.20 वर पॉझिटिव्हिटी आहे.
सक्रिय रुग्णांचीही शून्याकडे वाटचाल
जिल्ह्यात बाधितवाढ पूर्णपणे रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हय़ात मंगळवारपर्यंत 17 सक्रीय रूग्ण होते. यातच नव्या रूग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे लवकरच सक्रीय रूग्णांचा आकडाही शून्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
एप्रिलमध्ये निर्बंधांबाबत घोषणेची शक्यता
राज्यात कोरोनाचे रूग्ण कमी प्रमाणात आढळत असून तिसरी लाट जवळजवळ संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे सर्व प्रकारचे निर्बध उठवण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. हे निर्बंध एप्रिलमध्ये उठवले जाण्याची शक्यता आहे.
बुधवारी
नमुने-488
बाधित-1
बुधवारपर्यंत
नमुने-25,71,105
बाधित-2,79,195
मृत्यू-6683
मुक्त-2,71,792