अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 19 मार्च 2022, सकाळी 11.00
● एकट्या सातारा तालुक्यातील 2 जण बाधित
● दहा तालुक्यात एकही बाधित नाही
● 383 जणांचे स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 0.52 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा कोरोना मुक्त झालेला आहे. तरीही हा कोरोना मुळापासून तडीपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन मेहनत घेत आहे. त्याकरिता 12 वर्षांपासून पुढील मुलांना ही लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात काल दिवसभरात 383 जणांचे स्वॅब तपासणी केले तर 2 जण पॉझिटिव्ह नव्याने आढळून आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 0.52 वर आला आहे.
सातारा तालुक्यातील नव्याने दोन बाधित
संपुर्ण जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. मार्चच्या पंधरा तारखेपासून कोरोनाची वाटचाल शून्याच्या दिशेने आहे. जिल्ह्यातुन कोरोना हद्दपार पूर्णपणे करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन वर्षात सण उत्सव साजरे करता येत नव्हते. नियम आणि बंधने कडक होती. आता नियम शिथिल केले असल्याने जिल्ह्यात सण, उत्सव, यात्रा या साजऱ्या होऊ लागल्या आहेत. तरीही अजून कोरोनाचा पिच्छा सुटलेला नाही तो सोडवण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. नव्याने शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 383 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यात नव्याने सातारा तालुक्यात 2 जण बाधित आढळून आले इतर दहा तालुके निरंक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.52 वर आलेला आहे.
सक्रिय रुग्ण 40 च्या आत
जिल्हा कोरोनामुक्त झालेला असून जे घरच्या घरी उपचार घेऊन चांगले ठणठणीत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हाताच्या बोटावर मोजण्याऐवढं सक्रिय रुग्ण आहेत. काल पर्यत 39 जण काल सक्रीय होते. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 4 जण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.34 वर आलेला आहे.
शनिवारी
नमुने-383
बाधित-02
शनिवारपर्यंत
नमुने-25,66,237
बाधित-2,79,165
मृत्यू-6681
मुक्त-2,71,739