अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 16 जानेवारी 2022, दुपारी 12.15
● पॉझिटिव्हीटी 22 टक्क्यांवर
● स्वॅब तपासणी वाढवली; शनिवारी दिवसभरात 5079 जणांची तपासणी
● बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ शनिवारी सुरूच होती. शनिवारी दिवसभरात 5 हजार 79 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील 1117 जण नव्याने बाधित आढळून आले असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 22.00 वर गेला आहे. आरोग्य यंत्रणा उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मृत्यूदर रोखला गेला आहे.
तपासण्या वाढवल्या
गेल्या तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ज्यांना लक्षणे आहेत त्यांचेच स्वॅब तपासणी केली जात होती. त्यामुळे त्यावेळी स्वॅब तपासणी ही दोन ते अडीच हजारपर्यंत आलेली होती. आता मात्र बाधित रुग्ण वाढत असल्याने स्वॅब तपासणी वाढवण्यात आलेली आहे. कालच्या दिवसभरात 5 हजार 79 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले.
नव्या बाधितांनी ओलांडली हजारी
जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या वाढत चाललेली आहे. आरोग्य विभाग हे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन दिवसांत नव्याने बाधित हे नऊशेच्या पुढे आढळून येत होते तर 1117 जण शनिवारी दिवसभरात बाधित आढळून आले आहे.
रविवारी
नमुने-5079
बाधित-1117
रविवारपर्यंत
नमुने-24,33,135
बाधित-2,59,373
मुक्त-2,46,103
मृत्यू-6508