बेळगाव/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी सध्या सॅनिटायझरचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. यामुळे सॅनिटायझरचा तुटवडा भासू लागला आहे. यामुळे जिल्हय़ातील काही साखर कारखान्यांनी सॅनिटायझर बनविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अथणी येथील उगार शुगर्सने पुढाकार घेतला आहे. या कारखान्यात तयार करण्यात येत असणाऱया सॅनिटायझर्सची विक्री औषध दुकानाद्वारे तसेच थेट नागरिकांपर्यंत होत आहे. तर जिल्हय़ातील अन्य चार साखर कारखान्यातूनही सॅनिटायझर्स बनविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जवळ जवळ सर्वच औषध दुकानातील सॅनिटायझर्सचा तुटवडा भासू लागला आहे. तर काही ठिकाणी जादा दराने विक्री होत आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्यासाठी परवानगी दिली आहे. यानुसार जिल्हय़ातील पाच कारखान्यांमध्ये सॅनिटायझर बनविण्यात येत आहे. अथणी येथील उगार शुगर्स, सौंदत्ती तालुक्मयातील मुनवळ्ळी येथील रेणुका शुगर्स, गोकाक तालुक्मयातील सतिश शुगर्स, चिकोडी येथील दुधगंगा शुगर्स आणि बेडकीहाळमधील वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू आहे.
यापैकी उगार शुगर्स मध्ये बनविण्यात येत असणाऱया सॅनिटायझर्सची विक्री औषध दुकाने तसेच सर्वसामान्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत कारखान्यातून बनविण्यात येत असणाऱया सॅनिटायझर्सची विक्री राज्य सरकार तसेच धारवाड, हावेरी, आणि यादगिरी जिल्हय़ात करण्यात येत आहे. तर कोरोना संकटाशी अविरतपणे लढत असणाऱया वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस खाते, तहसीलदार, पिडिओ यासह आवश्यक सेवा करत असणाऱया अधिकाऱयांना मोफत सॅनिटायझर्स देण्यात येत आहे.
सॅनिटायझर्सची आवश्यकता असणाऱयांनी उगार शुगर्स कारखान्याचे विक्री व्यवस्थापक राजेंद बेळंकी यांच्याशी 9900559141 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.