प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी पाच पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७२५ वर पोहोचली. पण दिवसभरात ९ कोरोनामुक्तांना डिसचार्ज मिळाल्याने एकूण ६५० जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत १३४ रिपोर्टपैकी १३० निगेटिव्ह तर ५ पॉझिटिव्ह आले. यामध्ये आजरा, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी १ आणि गडहिंग्लज तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. आजअखेर जिह्यात ७३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, शाहूवाडी तालुक्यातील १८० पैकी एकाचा दुसराही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत वाढ झाले. दरम्यान, सकाळी 10 वाजेपर्यत जिल्हय़ात 5 पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले. यामध्ये आजरा, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी 1 आणि गडहिंग्लज तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. सायंकाळी आलेल्या 140 स्वॅबमध्ये 5 फॉलोअप स्वॅब पॉझिटिव्ह आले. पण नव्याने पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही.
जिल्हय़ात सकाळपर्यत 720 जणांची तपासणी करून 103 जणांचे स्वॅब घेण्यात आले तर 72 जणांना आयसोलेटेड केले आहे. तसेच तिघांना डिसचार्ज मिळाला आहे. सायंकाळपर्यत 824 जणांची तपासणी करून 91 स्वॅब घेण्यात आले तर 66 जणांना आयसोलेटेड केले आहे. 6 जणांना डिसचार्ज मिळाला आहे. त्यामुळे रात्रीपर्यत जिल्हय़ात 1 हजार 544 जणांची तपासणी करून 194 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 138 जणांना आयसोलेटेड केले आहे. 9 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरानामुक्तांची संख्या 650 वर पोहोचली आहे.
तालुका, नगरपालिका, महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 75, भुदरगड 71, चंदगड 75, गडहिंग्लज 84, गगनबावडा 6, हातकणंगले 10, कागल 57, करवीर 21, पन्हाळा 27, राधानगरी 66, शाहूवाडी 180, शिरोळ 7, नगर पालिका क्षेत्र 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 27 असे 717 आणि पुणे 1, सोलापूर 3, मुंबई 1, कर्नाटक 2 आणि आंध्र प्रदेश 1 असे इतर जिल्हा, राज्यातील 8 मिळून 725 बाधित रूण आहेत. त्यांपैकी 650 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. उपचारार्थ दाखल झालेल्या जिह्यातील रूग्णांची संख्या 73 इतकी असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.