कणकवली तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण : जामसंडे, झारापला प्रत्येकी तीन
प्रतिनिधी / ओरोस:
शनिवारी जिल्हय़ात ‘कोरोना’ची आणखी 17 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात आजवर सापडलेल्या रुग्णांची संख्या 390 वर गेली आहे. त्यापैकी 281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 101 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कणकवली शहर – 2, नांदगाव-2, फोंडाघाट- 1, जानवली-1, ओसरगाव-1, साटेली-भेडशी (दोडामार्ग) 1, शिरशिंगे (सावंतवाडी) -2, जामसंडे (देवगड) – 3, झाराप-कुडाळ-3 आणि पडवे हॉस्पिटलमध्ये दाखल एका रुग्णाचा समावश आहे.
कणकवली शहर बांधकरवाडी येथील हरी मारुती भिसे यांच्या घराजवळील 50 मीटर परिसर व तळेरे-चाफार्डेवाडी येथील मंदाकिनी रमाकांत पावसकर चाळीजवळील 50 मीटर परिसर 13 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील मांगेली-कुसगेवाडी येथील गुणाजी पांडुरंग गवस यांच्या घराजवळील 500 मीटर परिसर व सावंतवाडी न्यू साईलवाडा येथील घर क्रमांक 293/ ब मधील घराचा चारही बाजूचा परिसर 14 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकाऱयांनी दिली.
दरम्यान, या कंटेनमेंट झोनमध्ये ठरवून दिलेल्या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांनी येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 6321
अहवाल प्राप्त झालेले नमुने 6207
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 390
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 5833
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 114
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 101
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 281
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 121
शनिवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 5116
संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 18735
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 44
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15158
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3533
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 163243
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 42