94 जण कोरोना मुक्त : सावंतवाडीतील कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू
- आणखी दहा रुग्णांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे सावंतवाडी येथील 70 वषीय कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. तर आणखी दहाजणांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत 94 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्हचे 55 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात कोरोनामुळे देवगड तालुक्मयातील मधील कालवी आणि शिरगाव येथील दोन आणि मालवण तालुक्मयातील तळगाव येथील एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सावंतवाडी येथील 70 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा वृद्ध 10 जून रोजी मुंबई येथून आला होता. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते, अशी माहिती डॉ. चाकूरकर यांनी दिली.
आणखी दहाजणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात सोमवारी आणखी दहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील 154 रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 झाली आहे. तसेच चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजमितीस 55 सक्रिय रुग्ण आहेत.जिल्हय़ात गेल्या महिनाभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती. मात्र गेल्या चार/पाच दिवसांपासून वाढीचा हा वेग मंदावला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.
जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व्यक्ती लाखाच्या घरात
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मुंबई, पुणे व इतर जिल्हय़ांतून येणाऱया व्यक्तींचा ओघ अजूनही थांबलेला नसून दररोज अडीच ते तीन हजार व्यक्ती जिल्हय़ात येत आहेत. 2 मेपासून आतापर्यंत 96 हजार 172 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व्यक्तीची संख्या लाखाच्या घरात पोहोचली आहे.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 02976
अहवाल प्राप्त झालेले नमुने 02901
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00154
निगेटिव्ह आलेले नमुने 02747
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00075
सद्यस्थितीत जिल्हय़ात सक्रिय रुग्ण 00055
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 00094
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 00004
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 00084
सोमवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 04197
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 17927
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 00146
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15968
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 01813
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 96172