176 जणांची प्रकृती चिंताजनक : नव्याने 237 पॉझिटिव्ह : सक्रिय रुग्णसंख्या 2,889
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुरुवारी एका दिवसात कोरोनाने 15 जणांचा मृत्यू झाला.. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दहाजणांचा, तर एसएसपीएम पडवे हॉस्पिटलमध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 60 वर्षांखालील नऊ, तर 60 वर्षांवरील सहा रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 22 दिवसात तबबल 66 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे गुरुवारी आणखी 237 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 176 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. आतापर्यंत जिल्हय़ात 249 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 889 झाली आहे. तर आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा 10 हजार 763 झाला आहे. गुरुवारी बरे झालेल्या 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 7 हजार 619 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
176 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
जिल्हय़ात 176 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 153 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत
जिल्हय़ातील सद्यस्थिती : गुरुवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 237, सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 2,889, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण 7,619, मृत झालेले रुग्ण 249, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10,763.
सर्वाधिक 74 रुग्ण कणकवली तालुक्यात
तालुकानिहाय गुरुवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 37, दोडामार्ग – 10, कणकवली – 74, कुडाळ – 24, मालवण – 39, सावंतवाडी – 15, वैभववाडी – 23, वेंगुर्ले – आठ, जिल्हाबाहेरील – सात.
तालुकानिहाय आतापर्यंत मिळालेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 1066, दोडामार्ग – 567, कणकवली – 2870, कुडाळ – 2192, मालवण – 1090, सावंतवाडी – 1387, वैभववाडी – 679, वेंगुर्ले – 845, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 67.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 425, दोडामार्ग -171, कणकवली – 550, कुडाळ -461, मालवण -334, सावंतवाडी -322, वैभववाडी – 401, वेंगुर्ला – 191, जिल्हय़ाबाहेरील – 34.
तालुकानिहाय आतापर्यंतचे एकूण मृत्यू : देवगड – 22, दोडामार्ग – सहा, कणकवली – 60, कुडाळ – 43, मालवण – 28, सावंतवाडी – 50, वैभववाडी – 23, वेंगुर्ले – 16, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
गुरुवारचे तालुकानिहाय मृत्यू : देवगड – चार, कुडाळ – तीन, सावंतवाडी – दोन, वेंगुर्ले – दोन, कणकवली – दोन, मालवण – दोन.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने गुरुवारी 499, एकूण 58 हजार 721 पॉझिटिव्ह आलेले नमुने 7,548.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : गुरुवारी 282, एकूण 33 हजार 629. पैकी पॉझिटिव्ह 3,234.
जिल्हय़ात पंधराजणांचा मृत्यू
कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील 59 वर्षीय आणि कलमठ येथील 57 वर्षीय पुरुष, सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे येथील 65 वर्षीय पुरुष आणि सावंतवाडी येथील 55 वर्षीय महिला, वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथील 52 वर्षीय पुरुष आणि वेंगुर्ले येथील 55 वर्षीय महिला, कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील 78 व 65 वर्षीय पुरुष आणि कुडाळ येथील 47 वर्षीय पुरुष, मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील 50 वर्षीय पुरुष, माळगाव येथील 55 वर्षीय महिला तसेच देवगड तालुक्यात कुणकवण येथील 65 वर्षीय पुरुष, वळिवंडे येथील 66 वर्षीय महिला, गिर्ये येथील 75 वर्षीय महिला आणि किंजवडे येथील 49 वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.