रात्रीच्या अहवालात 00 बाधित 68 जणांचीकोरोनावरमा
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या 17 दिवसांपासून जिल्हय़ात बाधित वाढ 100 च्या खाली आली. तर यामध्ये अनेक दिवशी ती 50 च्या खाली घसरल्याचा दिलासा लाभत आहे. सर्वच तालुक्यात बाधित वाढ एक अंकी संख्येवर आली असून हॉटस्पॉट ठरलेले कराड व सातारा तालुकेही सावरु लागले आहेत. याच वातावरणात आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण सुरु असून जिल्हय़ात कोणालाही त्याची रिऍक्शन झालेली नाही. कोरोनाविरुध्दची लढाई आणि लसीकरण अशा दोन्ही आघाडय़ांवर आरोग्य विभाग लढत असल्याचे चित्र सध्या आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी अहवालात 68 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात फक्त बाधिताचा मृत्यू झाला तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सर्व तालुके आले एक अंकी संख्येवर
जिल्हय़ातील सर्वच तालुक्यात हजारोंच्या संख्येने बाधित आढळून येत होते. मात्र ती परिस्थिती संपली आहे. बाधित वाढ मंदावत गेली आणि गेल्या काही दिवसात दोन अंकी संख्येने तर सोमवारच्या अहवालात एक संख्येने बाधित वाढ समोर आली. कित्येक दिवसांनी सर्व तालुक्यातील बाधित वाढ एक संख्येने समोर आली असून काही तालुक्यात फक्त एक, एकच रुग्ण आढळून येत आहेत. आजमितीस एकूण उपचार्थ 691 रुग्ण दिसत असले तरी प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या फक्त 319 एवढीच आहे.
425 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 45, कराड 105, फलटण 4, कोरेगाव 16, वाई येथील 41, खंडाळा 2, रायगाव 7, पानमळेवाडी 95, महाबळेश्वर 10, दहिवडी 16, म्हसवड 12, पिंपोडा 6, तरडगाव 19 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 47 असे एकूण 425 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे.