जिल्हय़ात 13 लाख 95 हजार जनावरांना होणार लसीकरण
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हय़ातील 13 लाख 95 हजार जनावरांना येत्या 15 नोव्हेंबपर्यंत लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात लाळ खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्यक्ष मोहिमेला 2 ऑक्टोबर गांधी जयंतीदिवशी सुरुवात होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे आठवडाभर लांबणीवर पडलेल्या या मोहिमेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील गावोगावी पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत लसीकरण पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील गाय, बैल, म्हैस अशा एकूण 13 लाख 95 हजार तर तालुक्मयातील 1 लाख 26 हजार जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंगोपन खात्यासमोर आहे. ही लस पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत पोहोचविण्यसाठी 106 टीम तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पशुपरीक्षक, एक मैत्री कर्मचारी, एका मदतनीसाचा समावेश आहे. प्रत्येक टीममध्ये 6 ते 8 व्यक्ती आहेत.
जिल्हय़ात 28,09,109 तर बेळगाव तालुक्मयात 1,78,075 इतकी जनावरांची संख्या आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात पशुपालनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या अधिक आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांबरोबर 4 वर्षांवरील सर्व जनावरांना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरणापासून एकही जनावर वंचित राहू नये, यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनावरांना विविध प्रकारचे आजार उद्भवतात. त्याबरोबरच अलीकडच्या काही वर्षात लाळ खुरकतची मोठय़ा प्रमाणात लागण होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खात्यामार्फत वर्षभरात दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे जून महिन्याच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला स्थगिती मिळाली. अनलॉक 4 नुसार गुरुवारपासून जिल्हय़ात सर्वत्र या मोहिमेला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
लाळ खुरकतची लागण झाल्यास जनावर आजारी पडून दूध क्षमता कमी होते. रोग अति प्रमाणात झाल्यास जनावर दगावण्याची शक्मयता असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळ खुरकत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही खात्यामार्फत करण्यात आले आहे.
लाळ खुरकत हा विषाणूजन्य रोग असून हवेमार्फत पसरत असतो. त्याची लागण झाल्यास जनावरांच्या जीभेला पुरळ उठतात व पायांना जखमा होऊन त्यात किड निर्माण होते. ही लस टोचल्यानंतर दूध क्षमता कमी होते, असा शेतकऱयांना गैरसमज आहे. तसा कोणताही गैरसमज मनात न ठेवता सर्व पशुपालकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्यामार्फत करण्यात आले आहे.
जिह्यातील लहान-मोठय़ा 261 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या अधिपत्त्याखाली ही लसीकरण मोहीम चालणार असून बेळगावमध्ये दोन तर गोकाक व चिकोडीमध्ये एक अशा एकूण चार ठिकाणी व्हॅक्सिन डेपोची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांना लसीकरणासंबंधी साहित्य पुरविले जाणार आहे.
लसीकरणासाठी तयार असलेल्या टीमसाठी एन-95 मास्क, सॅनिटायझर व फेश शिल्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. या बरोबरच सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱयांना व मैत्री कर्मचाऱयांना कोरोनाचे नियम पाळूनच लसीकरण पूर्ण करावे लागणार आहे. जिल्हय़ात 62 जणांची मैत्री कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली असून लसीकरणासंबंधीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱयांना लसीकरणावेळी मैत्री कर्मचाऱयांची मदत होणार आहे.