प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यत तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले तर सहा कोरोनामुक्तांना डिसचार्ज मिळाला. आजपर्यत जिल्हय़ात ७३१ पॉझिटिव्ह रूग्ण असून त्यापैकी ६७४ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
जिल्हय़ात रात्री ८ वाजेपर्यत परजिल्हय़ांतून आलेल्या १ हजार ५०४ जणांची तपासणी केली. त्यापैकी २२४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यातील ९९ जणांना आयसोलेटेड केले आहे. दिवसभरात सहा जणांना डिसचार्ज मिळाला आहे. रात्रीपर्यत आलेल्या ३४१ स्वॅब रिपोर्टपैकी ३ पॉझिटिव्ह तर उर्वरित ३३६ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्हय़ात ७३१ कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी ६७४ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.