27 जणांनी केली कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील आणखी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या 24 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्या 390 आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
गणेशनगर, शिवाजी कॉलनी-टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, रॉय रोड-टिळकवाडी, न्यू वैभवनगर, टी. व्ही. सेंटर, शाहूनगर, पिरनवाडी, बसवणकुडची, शिवनेरी कॉलनी, महांतेशनगर, माळमारुती, न्यू गांधीनगर, आनंदवाडी-शहापूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्मयातील 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 137 इतकी झाली आहे. त्यापैकी 77 हजार 860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा सरकारी आकडा 887 आहे. शुक्रवारी बैलहोंगल, अथणी, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. केवळ बेळगाव आणि चिकोडी तालुक्मयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 5 हजार 320 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.