शाळा सुरू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेकडे विद्यार्थ्यांची रीघ लागली असून यंत्रणेवर ताण पडला आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील संशयितांची झालेली स्वॅब तपासणी जवळजवळ चार लाखांच्या घरात पोहोचली असून शनिवारी 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 3 लाख 96 हजार 565 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 3 लाख 55 हजार 358 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 290 इतकी झाली आहे.
आतापर्यंत 25 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 195 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी जिल्हय़ातील 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 11 जणांचा समावेश आहे.
भारतनगर-शहापूर, रामतीर्थनगर, राणी चन्नम्मानगर, श्रीनगर, हिंदवाडी, गौतमबुद्धनगर, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये 16 ते 18 वषीय तरुणांचाही समावेश आहे. अद्याप 12 हजार 718 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. तर 50 हजार 594 जण चौदा दिवसांच्या होमकेयरमध्ये आहेत.