प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसून येत असले तरी रविवारी कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 8 हजाराचा टप्पा पार केल़ा यामध्ये नव्याने 31 रूग्ण आढळून आले आहेत़ तर संगमेश्वर येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून प्राप्त झाली आह़े
रविवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 17 व ऍन्टीजेन टेस्टमध्ये 14 असे एकूण 31 रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरीत 8, दापोली 2, गुहागर 2, खेड 3, चिपळूण 13, राजापूर 3 असे रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून एकूण 158 टेस्ट करण्यात आल्या होत्य़ा कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे दिसत आह़े जिह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 8 हजार 04 इतकी झाली आह़े
जिल्हा कोविड रूग्णालय येथे 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जिह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 293 इतकी झाली आह़े तर जिह्यातील मृत्यूदर आता 3.6 इतका झाला आह़े सर्वाधिक 79 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले असून त्यानंतर चिपळूण येथे 69 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता खेड 49, गुहागर 11, दापोली 31, संगमेश्वर 30, लांजा 10, राजापूर 12 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 293 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.