प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये सोमवारी नव्याने 393 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत़ यामुळे एकूण बाधितांचा आकडा आता 33 हजार 239 वर पोहचला आह़े तर नव्याने 13 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसून येत आह़े मात्र त्यामध्ये घट होत असल्याचे चित्र दिसून येत नाह़ी त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आह़े
सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या 1 हजार 313 टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 269 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 124 अशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े तर 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 8 चिपळूण 2, खेड 2, दापोली 1, रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 1 हजार 98 झाली आह़े
तालुकानिहाय मृतांच्या संख्येनुसार रत्नागिरी 313, खेड 116, गुहागर 59, दापोली 98, चिपळूण 221, संगमेश्वर 145, लांजा 58, राजापूर 76, मंडणगड 12 मृत्यू झाले आहेत़ रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 3.30 इतका आहे पॉझिटिव्हीटी रेट 17.43 इतके आह़े
एकूण रूग्ण -33239
नवे रूग्ण -393
एकूण मृत्यू -1098
मृत्यू – 13